अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रेल्वे सवलतीस रेल्वे मंत्रालयाचा नकार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रेल्वे सवलतीस रेल्वे मंत्रालयाचा नकार
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्राचं 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी दिल्लीत आयोजित करण्यात आलं आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 या दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअम या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. मात्र या  मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्लीसाठी रेल्वे प्रवासातील सवलतीची मागणी रेल्वे मंत्रालयाने फेटाळली आहे.

सरहद संस्थेने यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. दरम्यान , आता आयोजकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांकडे मदत करण्याची विनंती केली आहे. दिल्लीत या पूर्वी झालेल्या संमेलनांना रेल्वेची सवलत मिळाली होती, पण यावेळी ती नाकारण्यात आली आहे. 

महाराष्ट्र आणि देश चालवण्यासाठी साहित्य हे खूप महत्त्वाचं आहे. पण महाराष्ट्राच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीत जाणाऱ्या साहित्यिक आणि मराठी वाचकांना रेल्वेकडून सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी साहित्य संमेलनासाठी तिकिटात सवलत देण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मागील दीड महिन्यांपासून सरहद संस्थेकडून पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे मिळावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात होता. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली ५० टक्के सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाने आज नकार दिला
इतर बातम्या
Join Whatsapp Group