विधानसभा निवडणूक २०२४ आता काही तासांवर आलं आहे. आणि प्रचार सभा आज पासून थंडावणार आहे. कोण होणार मुखयमंत्री, कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आणि त्यातच मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यसमाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. अबू आझमी यांना हृदय विकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान , त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कार्यकर्त्याकंडून माहिती देण्यात आली आहे. “अबू आझमी यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र आता ते घरी परतले आहेत. अबू आझमी सध्या ठीक आहे”, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान , अबू आझमी मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून गेल्या तीनही निवडणुकीत जिंकून आले असले तरी या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. अबू आझमी यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे देखील मानखुर्द-शिवाजीनगर येथून निवडणूक लढत आहेत. त्यामुळे अबू आझमी यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. असं असताना त्यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून आझमी यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली जात आहे.