पती घराबाहेर जाताच तिने बॉयफ्रेंडला बोलवलं, सासूनेच  उघडला बेडरुमचा दरवाजा , पुढे काय घडले ?
पती घराबाहेर जाताच तिने बॉयफ्रेंडला बोलवलं, सासूनेच उघडला बेडरुमचा दरवाजा , पुढे काय घडले ?
img
दैनिक भ्रमर
आजकाल विवाहबाह्य संबंधातून अनेक गुन्हे घडत आहेत. अशाच एका विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून एका महिलेने प्रियकरासोबत मिळून सासूची हत्या केली असल्याची धकाकदायक घटना  घडली आहे. आपल्या घराशेजारीच राहणाऱ्या प्रियकराला महिलेने पती घराबाहेर जाताच बोलावून घेतले,  बेडरुममध्ये दोघांचा रोमान्स सुरु झाला. तितक्यात सासू तिथे आली. सासूने रुमचा दरवाजा उघडताच तिला सूनेच नको ते रुप दिसलं. ते पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील ही घटना आहे.

सासूला समोर पाहून सून घाबरली. सासू नवऱ्याला सांगेल, या भितीपोटी सूनेने बॉयफ्रेंडच्या मदतीने सासूची हत्या केली. त्यानंतर कोणाला समजू नये, म्हणून मृतदेह जंगलात फेकून दिला. काही लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आपल्या पद्धतीने गुन्हेगारांना शोधून काढलं असून तिने  गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान , पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला कोर्टात हजर केलं. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. 24 वर्षाच्या लक्ष्मी सिंहने सोमवारी सचिनच्या साथीने आपल्या सासूची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी मृतदेह जंगलात फेकून दिला. आरोपी लक्ष्मीने सांगितलं की, “मागच्या अनेक वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या सचिन सोबत तिचं अफेयर सुरु होतं. दोघे अनेकदा भेटायचे. सोमवारी पती कामासाठी बाहेर निघून गेला, त्यावेळी तिने प्रियकराला बोलावलं. माझ्या सासूने आम्हाला दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. तिने नवऱ्याला हे सांगू नये म्हणून मी सासूची हत्या केली. डोक्यावर विटेचे अनेक प्रहार केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला”


इतर बातम्या
Join Whatsapp Group