नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाच्या वादावरून एकनाथ शिंदेनी दिली ''ही''  प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले ?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाच्या वादावरून एकनाथ शिंदेनी दिली ''ही'' प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
महायुती सरकारने बहुप्रतीक्षित पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आहे. दरम्यान यानंतर महायुतीतील  घडामोडींना वेग आला असून पालकमंत्रिपदाच्या यादीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. रायगडच्या  पालकमंत्रिपदावरून  भरत गोगावले नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले असून यावरून आता उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अशाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दरेगावला गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबद्दल भरत गोगावले यांनी मागणी केली ती काही चुकीची नाही, शेवटी त्यांनी रायगडमध्ये चांगलं काम केलं आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. पण नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रिपद आपल्याकडे न आल्यामुळे शिवसेनेत कमालीची नाराजी पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावी निघून आल्यामुळे नाराजी असल्याची चर्चा रंगली. अखेर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“महायुतीच्या नाराजीबाबत तुम्हाला का प्रश्न पडतात, तुम्हाला जे प्रश्न होते तिकीट वाटपापासून मंत्रिमंडळापर्यंत ते सर्व प्रश्न सुटत गेले आहेत. गोगावले यांनी अपेक्षा करणे किंवा मागणी करणे यात काही चुकीचं नाही. शेवटी त्यांनी रायगडमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सर्व बसून यावर मार्ग काढू” अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.

‘रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत लवकरच मार्ग निघेल. तुम्हाला जेवढ्या चिंता आहेत त्या सगळ्यावर लवकरच मार्ग निघेल आणि निर्णय होईल’ असंही शिंदेंनी सांगितलं.


इतर बातम्या
Join Whatsapp Group