राज्यात सध्या गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून आजकाल अल्पवयीन मुलांकडून हत्ये सारखे गंहीर गुणे घडत असल्याने ही बाबा अधिकच चिंताजनक आहे. अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय साईनाथ कळेकर नामक विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून केला. विष्णुपुरी रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सर्व पाच आरोपींना विमानतळ पोलीसांनी अटक केली .नांदेड शहरातील आनंदनगर भागात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
अटक आरोपीपैकी चार जण अल्पवयीन असून ते देखील महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. जुन्या वादाच्या कारणातून त्यांनी साईनाथ कळेकर या विद्यार्थ्याचा खून केल्याचे चौकशीत आरोपींनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, अटक आरोपींपैकी मुख्य आरोपी असलेल्या एकाने खून केल्यानंतर सह आरोपीसोबतचा फोटो आपल्या इन्स्टावर टाकला. त्यावर झाला ना 302… असे स्टेटस देखील ठेवले. शिवाय या आरोपीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या आयडीवर त्याच्या नावासोबत पूर्वीपासुनच 302 असा उल्लेख आहे. फरार असतानाही त्याने गुंडगिरीचे गाणे आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवले होते. सध्या आरोपी अटकेत असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.