मोठी दुर्घटना !  आग लागण्याच्या भीतीने   रेल्वेमधून  प्रवाशांनी उड्या मारल्या ! कुठे घडली घटना ?
मोठी दुर्घटना ! आग लागण्याच्या भीतीने रेल्वेमधून प्रवाशांनी उड्या मारल्या ! कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
जळगावमधून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.  एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या. मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहेजळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ ही  मोठी दुर्घटना घडली आहे. 

पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. या अपघातामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  

आगीची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरूवात केली, तेव्हाच समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती, या एक्सप्रेसखाली काही प्रवासी आले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group