रायगड तालुक्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या. त्यामुळे या कोबड्यांना तपासणीसाठी पाठवले असात कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले होते.
त्यामुळे आता हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्याच्यसोबत अंडी देखील नष्ट केली आहे. तसेय या घटनेनंतर या परिसरातील चिकनची दुकाने 9 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यासोबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , उरण मधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या मागील काही दिवसापासून कोंबड्या मृत पावत होत्या. त्यामुळे शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद वाटल्याने कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपळा आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने त्यांनी काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली.
आता चिरनेर परिसरातील 10 किलोमिटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, गावात जाऊन पशू वैद्यकीय अधिकऱ्यानी अशा हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केल्या असून, पुढील कारवाई सुरू आहे. आहेत.
याबत अधिक दक्षता घेण्यास प्रशासन आवाहन करत आहे.मात्र बर्ड फ्ल्यू सारखा रोग आल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन शासन प्रशासन करत आहे.केंद्र सरकारच्या कडून जवळपास 10 टीम तैनात करण्यात आल्या होत्या. ज्यांनी संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी आणि इतर सुविधा उपलब्ध केल्या असून अजूनही दोन टीम कार्यरत आहेत. पुढील तीन महिने संपूर्ण परिसरावर देखरेख करणारी टीम कार्यरत राहणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पोल्ट्री व्यवसाय चिंतेत असून आमच्या नष्ट केलेल्या कोंबड्यांची भरपाई योग्य आणि तात्काळ मिळावी अशी मागणी यावेळी केली आहे..
दरम्यान, खबरदारी म्हणून गावातील 1 हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. 1 किलोमिटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलाय. या परिसरातील चिकनची दुकाने 9 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे.