ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार; तर काँग्रेसचे 5 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले !  ''या''  बड्या नेत्याचा दावा
ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार; तर काँग्रेसचे 5 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले ! ''या'' बड्या नेत्याचा दावा
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून विधानसभा निवडणुकीत महाविकस आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला होता. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहेत.  अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडीती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. त्यातच आता उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे.

उदय सामंत हे सध्या दावोसमध्ये आहे. यावेळी त्यांनी दावोसमधून दोन मोठ्या घडामोडी सांगितल्या आहेत. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. तसेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाचे ४ आमदार आणि ३ खासदार हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटले. तर काँग्रेसचे 5 आमदार पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटून गेले, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

दरम्यान, येत्या तीन महिन्यांत उद्धव ठाकरे गटाचे 10 माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख हे शिंदे गटात प्रवेश करतील. तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारीही लवकरच शिवसेनेत सामील होतील, असा दावा उदय सामंत यांनी केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group