अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रात्री दीडच्या सुमारास हल्ला झाला सैफच्या मानेवर, हातावर चाकूने वार करण्यात आले, पाठीत चाकू खुपसण्यात आला. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली. दरम्यान त्या रात्री सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी रिक्षाने लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, आपल्याला वेळेत लिलावती रुग्णालयात पोहोचवणाऱ्या या रिक्षाचालकाला सैफने किती पैसे दिले असावेत, याचा तुम्ही विचार केला आहे का?
सैफला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून करीना कपूर घाबरली. तिने जवळ राहणारा सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला फोन केला. तो सैफच्या घराखाली रिक्षा घेऊन आला आणि त्याने रिक्षात बसवून वडील सैफला लीलावती रुग्णालयात नेलं.
पण इतक्या कार असताना सर्वसामान्यांसारखी रिक्षाने जाण्याची वेळ त्याच्यावर का आली असा प्रश्न पडतोच सैफला रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं कारण रात्री घटना घडली तेव्हा त्याचा ड्रायव्हर उपलब्ध नव्हता. रात्री 11 वाजता ड्रायव्हरची शिफ्ट संपली आणि तो निघून गेला. हल्ला झाल्यानंतर जखमी सैफला लवकरात लवकर रुग्णालयात नेणं महत्त्वाचं होतं. थोडा जरी उशीर झाला असता तर सैफचा जीव धोक्यात आला असता. सैफचा मुलगा इब्राहिम अली खानने योग्य वेळी प्रसंगावधान दाखवून सैफला रिक्षातून रुग्णालयात नेलं.
सैफला रिक्षाने लीलावती हॉस्पिटलला नेणारा ऑटोवाला समोर आला आणि त्याने जे काही घडलं ते सगळं सांगितलं. तो म्हणाला, त्याच्या पाठीला लागलं होतं, रक्त वाहत असल्याने मला खूपच वाईट वाटलं. माझ्या रिक्षात सैफ अली खान बसलाय, याची मला कल्पना नव्हती. कुणीतरी दुखापतग्रस्त व्यक्ती बसलेला असेल, असं मला वाटलं. लीलावती रुग्णालयात गेल्यानंतर रिक्षातून ज्यावेळी सैफ आणि त्याचा मुलगा खाली उतरला, त्यावेळी रिक्षात स्टार अभिनेता बसला होता, हे मला कळलं. माझी रिक्षा इमर्जन्सी गेटमध्ये गेली. तेथील रुग्णवाहिका लगोलग हटवण्यात आली. परिस्थिती पाहून रुग्णालयातील कर्मचारी तातडीने रिक्षाकडे धावले. एव्हाना तोपर्यंत त्यांनाही सैफ अली खान असल्याचं कळालं होतं. त्याच्या पाठीतून चांगलेच रक्त वाहत होते.
ज्यावेळी माझ्या रिक्षात सैफ बसला त्यावेळी तो हळूहळू चालत माझ्या रिक्षापर्यंत आला. त्याच्यासोबत त्याच्यासोबत त्याची दोन मुले होती. छोटा मुलगा तैमूर त्याच्यासोबत होता. दोन महिलांनी अगदी शांतपणे व्यवस्थित रिक्षात बसवले माझे अन्यत्र लक्ष नव्हते. फक्त जखमीला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जाणे ही माझी जबाबदारी मी समजली. रिक्षात बसल्या बसल्या सैफने मला विचारलं की रिक्षा रुग्णालयात जाण्यासाठी किती वेळ लागेल? पुढच्या सात ते आठ मिनिटांत मी माझी रिक्षा रुग्णालयाच्या दारात उभी केली.
रिक्षाचालकाने अगदी काही वेळात सैफला लिलावती रुग्णालयात पोहोचलं. यामुळे सैफला वेळेत उपचार मिळाले आणि त्याचा जीव वाचला. मीडिया रिपोर्टनुसार रिक्षाचालकाने सैफकडून एकही पैसा घेतला नाही.