नाशिक :- 10 हजारांची लाच मागून 1 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
बळीराम सुभाष सोनवणे (वय 55, मुख्याध्यापक, जि.प. मराठी शाळा पिपळकोठा, ता. एरंडोल जि.जळगांव) व जे डी पाटिल (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, एरंडोल) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे प्राथमिक शाळा पिपळकोठे येथे शिक्षक या पदावर नेमणुकीस आहेत. सोनवणे हे मुख्याध्यापक आहेत. यातील संशयित आरोपी शिक्षण विस्तार अधिकारी यांनी गेल्या सोमवारी त्यांच्या शाळेचे इन्स्पेक्शन केले होते. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी इन्स्पेक्शन मध्ये चांगल्या शेरा लिहावा म्हणून 10 हजार रुपये मागितले आहेत ते सर्व शिक्षकांना द्यावे लागतील असे सांगुन इतर शिक्षकाकडून प्रत्येकी 1000 रुपये घेतले होते. तक्रारदार व अन्य एक शिक्षक यांचे असे एकूण 2000 रुपये बाकी होते. त्याबाबत तक्रारदार यांच्याकडुन 1000 रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक सोनवणे यांनी केली होती.
त्याबाबत तक्रारदार यांनी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. या तक्रारी प्रमाणे साक्षीदार शिक्षक व पंचासमक्ष पडताळणी केली असता सोनवणे यांनी संशयित शिक्षण विस्तार अधिकारी पाटील यांनी 10 हजार सांगितले आहेत तुम्हाला यावेळी पैसे द्यावेच लागतील असे सांगुन तक्रारदार यांचेकडून 1000 रूपये लाचेची मागणी करुन आज 1000 रुपये लाच रक्कम घेताना त्यांना मुख्याध्यापक कार्यालय पिपळकोठा ता.एरंडोल येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच शिक्षण विस्तर अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता त्यांनी 2000 रुपये मिळल्या बाबत विरोध दर्शवला नाही व नंतर कॉल करतो असे सांगून लाच रकमेबाबत कोणताही विरोध दर्शवला नाही.
या बाबत अधिक तपास करून संशयित सोनवणे व पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करीत आहोत. तसेच एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर,
सफौ सुरेश पाटील, चालक पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने यांनी केली.