छत्रपती संभाजीनगर : राज्यात मुंबईतील टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच शहरात दरमहा ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
बड्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन कंपनीत गुंतवणूक केल्यास महिना ३ टक्के परतावा देण्याचे आमिष गांधी व शहाने दाखवले होते. अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान पैसे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार घाबरले. त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली. तेव्हा शाखाच बंद आढळली. आरोपी शीतल व विठ्ठलने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून संपर्क बंद केला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद यांनी शीतल, विठ्ठलला अटक केली.