गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून हत्येसारख्या क्रूर आणि गंभीर गुणे सर्रास पाने केले जात आहेत ,म्हणून कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. अशीच एक धकाकदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांची गँग धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवत असल्याचं उघड झालं आहे. एवढंच नाहीतर स्टेट्स ठेवून एका अल्पवयीन मुलाची हत्याही करण्यात आली. या प्रकरणी 3 जणांना अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. कोल्हापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे .
स्टेटस ठेऊन दहशत माजवत खून करण्याचे प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. तलवारी, एडका आणि ब्लेड अशी हत्यारे व्हिडीओमध्ये दाखवत सोशल मीडियावर दाखवून उघडपणे गुंडगिरी सुरू आहे. हे अल्पवयीन मुलं शस्त्र आणि पिस्तुली रिल्समध्ये दाखवून दहशत पसरवत आहे. BK COMPANY असं या पोरांच्या टोळीचा ग्रुप आहे. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेली ही पोरं कोयते घेऊन रस्त्यावर कुठे गाडी अडवत आहे. तर कुणी पिस्तुली घेऊन दुचाकीवर दमदाटी करत आहे. एवढंच नाहीतर, रील्स बनवून उघडपणे शिवीगाळ करून धमकीही देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातल्या गांधीनगर इथल्या विठ्ठल सुभाष शिंदे या तरुणाचा खून करण्यात आला. 6 ते 7 जणांच्या टोळक्याने विठ्ठल शिंदे याच्यावर कोयत्याने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केली होती. पोलिसांनी अवघ्या तीन तासात पोलिसांनी छडा लावला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना पोलिसांनी जेरबंद केलं होतं. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गांधीनगर आणि करवीर पोलिसांनी ही संयुक्तरित्या कारवाई केली आहे. मात्र हत्येचा नवा प्रकार समोर आला आहे.