केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, काय म्हणाले ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
विधासभा निवडणुकीत महायुती सरकारने ऐतिहासिक विजय मिळविला तर महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह यांनी  उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कोणत्याच प्रकारचे भाष्य करणे टाळले होते परंतु आता शिर्डी येथे होत असलेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलं आहे. 

शरद पवार यांनी कायमच दगाफटक्याचे राजकारण केले. त्यांचे राजकारण २० फूट जमिनीत गाडण्याचे काम राज्यातील जनतेने केले तसेच बाळासाहेबांची विचारधारा सोडून गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेने दागा दाखवली, अशा शब्दात अमित शाह यांनी दोन्ही नेत्यांवर तोफ डागली.

अमित शाह म्हणाले, शरद पवार यांचा मी एक फोटो पाहिला. त्यांच्यामागे महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागांचा नकाशा लावला होता. लोकसभेत कोणत्या विभागात काय काय होईल याची भविष्यवाणी ते समोर बसलेल्या पत्रकारांसमोर करीत होते. मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही सांगितलेल्या प्रदेशात आम्ही काय काय केलं! उत्तर महाराष्ट्रात 19, कोकणात 16, पश्चिम महाराष्ट्रात 24 जागा आम्ही जिंकल्या. ज्यांनी आपल्याला धोका दिल्या त्यांना जागा दाखविण्याचे काम जनतेने केले, असे शाह म्हणाले.

शरद पवार यांनी दगाफटक्याचं राजकारण केलं. शरद पवारांच्या दगा फटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत मातीत घालण्याचे काम महाराष्ट्राने केले. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने जागा दाखवली.यातून सनातन धर्म आणि हिंदुत्वाचा महाराष्ट्राने कायमच पुरस्कार केल्याचे शाह म्हणाले.

तसेच  आपल्याबरोबरच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जोरदार यश मिळाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच बाळासाहेबांची शिवसेना तर अजितदादांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी असल्याचे अमित शाह म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group