हॉर्न वाजवल्यावरून वाद ! दोन जणांकडून एका कुटुंबाला जबर मारहाण
हॉर्न वाजवल्यावरून वाद ! दोन जणांकडून एका कुटुंबाला जबर मारहाण
img
दैनिक भ्रमर
कधी कधी किरकोळ वादाच रूपांतर कधी मोठ्या भांडणात होईल याचा काही नेम नसतो. अशीच एक धकाकदायक घटना समोर आली असून केवळ  गाडीचा हॉर्न वाजवल्यावरून वाद होऊन एका कुटुंबाला जबर मारहाण केल्या असल्याची घटना पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात गाडीचा हॉर्न वाजवल्यावरून या वादाला तोंड फुटलं. यानंतर आरोपींनी चालकाला फायटर सारख्या शस्त्राने बेदम मारहाण केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. एवढंच नव्हे तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीला देखील आरोपींनी मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी ९ तारखेला तक्रारदार राजेश वाकचौरे आपल्या पत्नी सुवर्णा वाकचौरे आणि मुलगी संकृती यांच्यासह बाहेर जात होते. दरम्यान, मुंढवा येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ हॉर्न वाजवल्यामुळे त्यांचं आरोपींसोबत भांडण झालं. यावेळी मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांनी फायटर सारख्या हत्याराने आणि शस्त्राने राजेश यांना मारहाण केली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपींनी वाकचौरे यांच्या गाडीवर मोठा दगड मारला, काच फोडली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपींनी राजेश यांना वाचवण्यासाठी आलेली मुलगी संस्कृती आणि त्यांची पत्नी सुवर्णा यांना देखील बेदम मारहाण केली. आरोपींनी दोघींच्या छातीवर बुक्क्या आणि पोटात लाथा मारल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डीबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुख्य आरोपी शुभम गायकवाड आणि त्याचे वडील राजू गायकवाड यांना ताब्यात घेतलं. या घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

 पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे. शुभम गायकवाड आणि राजू गायकवाड अशी आरोपींची नावं आहेत. तर राजेश नाथोबा वाकचौरे (वय ५० वर्षे) सुवर्णा राजेश वाकचौरे आणि संस्कृती राजेश वाकचौरे असं मारहाण झालेल्या कुटुंबाचं नाव असून ते पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात वास्तव्याला आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group