नाशिकच्या नील चंद्रात्रेच्या फिरकीची जादू : भारतात तिसरा
नाशिकच्या नील चंद्रात्रेच्या फिरकीची जादू : भारतात तिसरा
img
दैनिक भ्रमर
 नाशिक (भ्रमर  प्रतिनिधी) - भारतीय क्रिकेट नियमकमंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या सोळा वर्षांतील विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये नील चंद्रात्रे यांनी चांगलीच धमाल उडवून दिली आहे. त्याने  स्पर्धेत तीन सामन्यात एकूण ३१ बळी घेत महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

 महाराष्ट्र संघातर्फे , उपांत्यपूर्व फेरीत मध्य प्रदेश विरुद्ध दुसऱ्या डावात ५ बळी  घेत सामन्यात एकूण ६ बळी घेण्याची प्रभावी कामगिरी केली. मध्य प्रदेश विरुद्ध दुसऱ्या डावात एकूण ३६१ धावांमध्ये , नीलने आपल्या भेदक डावखुरया फिरकी गोलंदाजीने  २६-१-८०-५ अशी षटकामागे केवळ ३.०८ धावा देत उत्कृष्ट कामगिरी केली. नंतर विजयासाठी २२९ धावांचा पाठलाग करणाऱ्या, महाराष्ट्र संघाच्या डावात , आठव्या क्रमांकावर अतिशय संयमी फलंदाजी करत नीलने एकूण ११४ चेंडू खेळत ९ धावा केल्या व ३३ व्या षटकात ६ बाद ७६ वरुन , इतर फलंदाजांना बरोबर घेत तब्बल ३६ षटके किल्ला लढवला. पण हि कामगिरी महाराष्ट्र संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात मध्य प्रदेशने चांगली फलंदाजी करत महाराष्ट्र संघाला अखेर १०५ धावांनी पराभूत केले.

या बी सी सी आय च्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत तीन सामन्यात एकूण ३१ बळी घेत महाराष्ट्रात सर्वोत्तम तर भारतात तिसरे  स्थान मिळवले. सुरत येथे झालेल्या सुरुवातीच्या काही साखळी सामन्यात संघात समावेश नसलेल्या नीलला गोवाविरुद्धच्या सामन्याआधी खास बोलावून घेण्यात आले. तेव्हापासून नीलने आपल्या भेदक डावखुरया फिरकी गोलंदाजीने अफलातून कामगिरी केली. गोवाविरुद्धच्या सामन्यात ७ व ८ असे एकूण १५ बळी , तर  वडोदराविरुद्ध  दोन्ही डावात प्रत्येकी ५ बळी  घेत सामन्यात एकूण १० बळी घेण्याची जोरदार कामगिरी केली होती व महाराष्ट्र संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेण्यात मोठा वाटा उचलला. दरम्यान नील चंद्रात्रे हा नाशिक जिमखाना येथे संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. रणजीपटू सत्यजित बच्छाव हा देखील संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेत आहे.

या स्पर्धेतील  अशा अफलातून कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी नील चंद्रात्रेचे खास अभिनंदन केले आहे .
इतर बातम्या
Join Whatsapp Group