पक्षाच्याच आमदारांनी   केली धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ? नेमकं काय घडतंय ?
पक्षाच्याच आमदारांनी केली धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ? नेमकं काय घडतंय ?
img
दैनिक भ्रमर
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला असून या प्रकरणात  धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय. 

 विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्या पक्षातील आमदारांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यामागचं संकट काही कमी होताना दिसत नाही.

“मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या”, असं मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. धनंजय मुंडे यांची आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत असलेल्या जवळकीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू नये, त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढावी, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठवाड्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकूण 5 आमदार आहेत. यामध्ये बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके यांचा समावेश आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group