धक्कादायक ! पोलिस कर्मचाऱ्याने केला पत्नीवर गोळीबार ! नेमकं काय घडलं ?
धक्कादायक ! पोलिस कर्मचाऱ्याने केला पत्नीवर गोळीबार ! नेमकं काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून या बंडखोरांना कायद्याचा धाक उरलेला नाही. परंतु आता चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानेच आपल्या पत्नीवर गोळीबार केला असल्याची धकाकदायक उघडकीस आली आहे. 
पोलिसा  कर्मचाऱ्याने आपल्या बायकोवर गोळीबार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कायद्याचं रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून असा गुन्हा घडल्याने या घटनेने एकाच खळबळ निर्माण झाली आहे. हिंगोलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला असून  तर सासू आणि  मेव्हणा गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,   हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात ही घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पिस्तुलीतून आपल्या पत्नीवर गोळीबार केला. यामध्ये पत्नी ठार झाली आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याची माहिती पुढे येत आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. दरम्यान, हा कर्मचारी वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने हे कृत्य का केलं, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group