नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातीत दिंडोरीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिंडोरीतील एका लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू होता.
प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. 20 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यापूर्वी आडगावला 2017 मध्ये 2021 ला सुरगाण्यात आणि 2024 ला निवडणूक काळात अंबडला बनावट नोटांच्या संदर्भात कारवाई केली होती. वारंवार बनवेगिरीची प्रकरणे उघड होऊनही असे धक्कादायक प्रकार सुरूच आहेत.