खळबळजनक ! ऊसतोड मजुराची दगडानं ठेचून हत्या, कुठे घडली घटना ?
खळबळजनक ! ऊसतोड मजुराची दगडानं ठेचून हत्या, कुठे घडली घटना ?
img
दैनिक भ्रमर
दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून दरदिवशी अनेक घटना ऐकायला येत असतात. दरम्यान अशीच एक खळबळजनक बातमी उगघडकीस आली आहे. 

कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेलेल्या परळीतील मजुराची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विकास जोगदंड असं या ऊसतोड मजुराचं नाव आहे.  मुकादमाची प्रकृती खराब असल्यानं तो आपल्या मुकादमाला उपचासाठी रुग्णालयात घेऊन गेला होता. तो त्या रात्री रुग्णालयाबाहेरच झोपला. याचवेळी दगडानं ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दरम्यान विकास जोगदंड यांची हत्या नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समोर आलेलं नाही, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं  माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती अशी की , मुकादमाची प्रकृती बिघडल्यानं विकास जोगदंड हे आपल्या मुकादमाला घेऊन रुग्णालयात गेले. यावेळी ते रुग्णालयाबाहेर झोपले असताना त्यांच्यावर आरोपीने हल्ला केला. त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने जोगदड यांच्या छातीवर बसून दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. दरम्यान ही बाब रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने आरोपीला पकडे, त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास जोगदंड यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कर्नाटकातील घटप्रभा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group