आज काल राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून काही लोकांची मानसिकता अत्यंत विकृत असते हे काही घटनांमधून स्पधा होते. अशीच एक क्रूरतेची परिसीमा गाठणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका इसमाने चिमुकलीला बेदम मारहाण करत गाला दाबून तिला खड्ड्यात फेकून दिले. पुण्याच्या उरुळी कांचन जवळ असणाऱ्या नायगावमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणाऱ्या 7 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण करून, रुमालाने गळा दाबून खड्ड्यात फेकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. यानंतर मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मुलीचे आई-वडील रुग्णालयात गेले असताना ही मुलगी एकटीच घरी होती. नेहमीप्रमाणे मुलगी संध्याकाळी शेजारच्या पोल्ट्री फार्ममध्ये मुलांसोबत खेळायला आली, पण तिथली मुलं गावाला गेली होती. त्यावेळी आरोपी सुखदेव जगन्नाथ याने मुलीला खाण्याचं आमिष दाखवलं आणि तो तिला राहत्या खोलीत घेऊन गेला.
खोलीमध्ये नेल्यावर त्याने मुलीला मारहाण करायला सुरूवात केली. परिसरात कुणी नसल्यामुळे आरोपीने मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबला आणि तिला खड्ड्यात फेकून दिलं. मुलगी खड्ड्यातून बाहेर आली तेव्हा ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती, तसंच पूर्ण चिखलाने माखलेली होती.
घरी आल्यानंतर मुलीने घाबरत सगळा प्रकार सांगितला, यानंतर मुलीला कुंजीरवाडीतील सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. यानंतर पुढील उपचाराकरता मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.