नाशिकच्या माजी नगरसेवकासह 11 जणांविरुद्ध पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
नाशिकच्या माजी नगरसेवकासह 11 जणांविरुद्ध पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर


नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महिलेच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन मिळकत हडपण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करून जिवे मारण्याची धमकी देऊन, तसेच मिळकतीऐवजी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला या व्यापारी आहेत. लुल्ला यांची राणेनगर येथे हॉटेल साई पॅलेसच्या शेजारी सर्व्हे नंबर 903/3 ब/2 यांसी क्षेत्र 21122 चौरस मीटर ही मिळकत आहे. आरोपी गुल ऊर्फ राजू लखमीचंद लुल्ला, हेमंत पद्माकर चव्हाण, किरण दत्तात्रय वाळके, शकील अहमद नजीर अहमद, माजी नगरसेवक पवन पवार, विशाल पवार, प्रवीण किशनलाल बेंच, सुभाष बाबूराव तमखाने, पवन दादाजी जाधव, सचिन भास्कर बच्छाव व सतीश माणिक भालेराव यांनी संगनमत करून फिर्यादी लुल्ला यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचून त्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा उचलून त्यांची मौल्यवान मिळकत हडप करण्यासाठी मिळकतीची खोटी कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादी लुल्ला यांची फसवरून करून त्यांच्या मिळकतीत गुंड आणून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच या मिळकतीऐवजी आरोपींनी महिलेकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली, तसेच मिळकतीची नासधूस व नुकसान करून शिक्षापात्र स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यासारखे कृत्य केले. हा प्रकार सन 2022 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत घडला.

या प्रकरणी महिलेच्या  फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group