धक्कादायक ! नवरा बायकोसह दोन मुलांची सामुहिक आत्महत्या, कुठे घडली घटना?
धक्कादायक ! नवरा बायकोसह दोन मुलांची सामुहिक आत्महत्या, कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबियांनी सामुहिक आत्महत्या का केली? यामागचं कारण समजू शकले नाही आहे. मात्र या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या  माहितीनुसार, राजस्थानच्या झालावाड जिल्ह्या्च्या जेताखेडी गावात ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत नवरा बायकोने आपल्या दोन मुलांसह गळफास लावून आयुष्य संपवलं आहे. यामध्ये मृत व्यक्तीचे नागू सिंह आणि त्यांची बायको संतोष बाई असे आहे. या नवरा बायकोने त्याच्या दोन चिमुकल्यांनी आयुष्य संपवलं आहे.

दरम्यान या घटनेची कल्पना कुणालाच नव्हती. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात जाऊन विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता या घटनेचा उलगडा झाला.

या घटनेनंतर तत्काळ शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृ्त्यूची कारण समजणार आहे. तसेच पोलिसांनी देखील घटनास्थळाचा तपास केला आहे.

मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची सूसाईड नोट सापडली नाही आहे. तसेच शेजाऱ्यांची देखील चौकशी केली असता त्यांनी देखील मृत्यू मागचं ठोस कारण सांगितलं नाही आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या सामुहिक आत्महत्येचा उलगडा करण्याच मोठं आव्हान आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group