प्रेमाचा अजब मामला..! पठ्ठ्याला महागडे गिफ्ट देऊन गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचं होतं म्हणून थेट बँक लुटायला गेला, पण.....; काय झाले वाचा?
प्रेमाचा अजब मामला..! पठ्ठ्याला महागडे गिफ्ट देऊन गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचं होतं म्हणून थेट बँक लुटायला गेला, पण.....; काय झाले वाचा?
img
Dipali Ghadwaje
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे प्रेमाचा अजब मामला समोर आलाय. प्रेमासाठी तरूण चक्क चोर बनला. तरुणानं गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करला. थेट बँक लुटण्याचं धाडस त्यानं केलं. पण त्याचं हे धाडस अपयशी ठरलं. अवघ्या ३ तासांत तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहीद असं या प्रेमवीराचं नाव आहे. त्याच्या एक-दोन नव्हे तर एकाचवेळी तीन-तीन प्रेयसी होत्या. त्यातली एक तर विदेशातील 'सुंदरी' आहे. कॅनडात राहणाऱ्या तरुणीशी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. दोघे चॅटिंग करू लागले. दोघांत सूत जुळले. मग काय तिला काहीही करून इम्प्रेस करायचं होतं. पठ्ठ्यानं थेट बँक लुटण्याचाही प्लान आखला. दिवाळीत चार दिवस सुट्ट्या होत्या. ३१ ऑक्टोबरच्या रात्री त्यानं आखलेल्या प्लाननुसार बाराबंकीतील राष्ट्रीय बँकेच्या कार्यालयाचे शटर तोडण्याचा प्रयत्न केला. त्याला बँकेत घुसायचं होतं. पण तो अपयशी ठरला. 

बँकेतलं लॉकर तोडून सगळे पैसे गायब करण्याचा त्याचा डाव होता. चार दिवसांनी बँक कर्मचाऱ्यांनी शटर आणि टाळं फोडल्याचं बघितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. 

त्यांनी तात्काळ याबाबत फोनवरून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी एक पथक नेमलं. त्यात फॉरेन्सिक आणि श्वान पथकही होते. घटनास्थळी पोहोचून त्यांनी बँकेच्या कार्यालयाची पाहणी केली. तिजोरीतील एकही पैसा चोरीला गेला नव्हता. ही बाब लक्षात आल्यावर बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, अवघ्या ३ तासांत चोर सापडला पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले.

त्यानंतर अवघ्या तीन तासांत शाहीदला अटक केली. त्याची चौकशी केली. त्यात काही रंजक गोष्टी समोर आल्या. शाहीदला तीन - तीन गर्लफ्रेंड आहेत. एक कॅनडाला राहते, असे चौकशीत त्याने सांगितले. ...म्हणून बँक लुटण्याचा प्लान आखला गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट देऊन तिला इम्प्रेस करायचं होतं. मग त्यानं बँक लुटण्याचा प्लान आखला. दिवाळी आणि चार दिवस सुट्टी यामुळं बँकेत कुणी नसेल असा विचार त्याच्या मनात आला. बँकेच्या तिजोरीत खूप पैसा मिळेल, असं त्याला वाटलं. पण प्लान फसला. उलट तोच या जाळ्यात अडकला. अवघ्या ३ तासांत तो पोलिसांच्या हाती लागला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group