सख्खा मामाच निघाला नराधम !  निर्जनस्थळी नेऊन 4 वर्षीय भाचीवर केला अत्याचार
सख्खा मामाच निघाला नराधम ! निर्जनस्थळी नेऊन 4 वर्षीय भाचीवर केला अत्याचार
img
दैनिक भ्रमर
सध्या राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. दरम्यान , महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. लहान काही दिवसांआधी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली. ती घटना ताजी असतानाच राज्यभरातून चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. दरम्यान आता पुणे जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर अली आहे. 

मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण गावातील दवणेवस्त  येथे रहात्या घरात आई सोबत झोपलेल्या 4 वर्षीय भाचीला झोपत उचलून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात करण्यात आल्याची
संतापजनक घटना घडली आहे.

मामाने सख्ख्या चार वर्षीय भाचीवर अत्याचार केला आहे. मनिषकुमार सिंग असे अत्याचार करणा-या मामाचेनाव आहे. पीडित मुलीचे कुटुंब बिहार येथील रहिवाशी आहेत. पीडित मुलीचे वडिल एका खासगी कंपनीतकामाला गेले असताना घरात झोपलेल्या 4 वर्षीय मुलीला तिच्या मामाने उठवून घराबाहेर निर्जनस्थळी नेले. जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करुन तिकडेच सोडून दिले. या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक
केली आहे.

डीसीपी शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘माळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळीएका चार वर्षीय मुलीवर लैंगिलैं क अत्याचार झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन अंमलदार त्याठिकाणी पोहोचले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित मुलीचा नातेवाईकच आहे. सख्खा मामा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडीत मुलीच्या आईच्या
तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास करत आहोत
इतर बातम्या
Join Whatsapp Group