X युजर्सना धक्का!   यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही,  Elon Musk ची घोषणा,
X युजर्सना धक्का! यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही, Elon Musk ची घोषणा,
img
दैनिक भ्रमर
 X चे मालक Elon Musk ने एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा X युजर्ससाठी असणार आहे. X कंपनी लवकरच त्याच्या टेक्स्ट फॉरमॅटिंग वैशिष्ट्यात बदल करणार आहे. X अकाऊंटवर पोस्ट करत Elon Musk ने याबाबत माहिती दिली आहे. X आपल्या युजर्सना मजकूर फॉरमॅटिंगसाठी बोल्ड ( B ) आणि इटालिक ( I ) फॉन्टमध्ये लिहिण्याची सुविधा प्रदान करते, ज्याच्या मदतीने वापरकर्ते पोस्टचा मजकूर हायलाइट करू शकतात. मात्र, X वर होणाऱ्या या बदलानंतर ठळक अक्षरात लिहिलेला मजकूर आता थेट दिसणार नाही.

इलॉन मस्क यांनी दिली माहिती इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्टमध्ये खूप बोल्ड फॉन्ट वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, अशा पोस्ट यापुढे मुख्य टाइमलाइनवर दर्शविल्या जाणार नाहीत. बोल्ड फॉन्टद्वारे युजरला त्यांच्या पोस्टमधील काही भाग हायलाइट करता येतो. पण, त्याचा जास्त वापरर केल्यास पोस्टचे आकर्षण कमी होऊ शकते, असेही मस्क यांनी सांगितले. 

तसेच, हा बदल त्वरित लागू होईल. याचा अर्थ असा की, बोल्ड फॉरमॅट केलेला कोणताही मजकूर मेन टाइमलाइनवर दाखवला जाणार नाही. युजर्सना बोल्ड पोस्ट पाहण्यासाठी वैयक्तिक पोस्टवर क्लिक करावे लागेल. हे अपडेट केवळ वेब वापरकर्त्यांसाठीच लागू नाही, तर iOS आणि Android ॲप वापरकर्त्यांसाठीदेखील लागू केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group