उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणचं भरभरून कौतुक, म्हणाले..
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून 'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणचं भरभरून कौतुक, म्हणाले..
img
दैनिक भ्रमर
कालच मराठी बिग बॉस चा ग्रँड फिनाले पार पडला त्यात सुरज चव्हाण याने विजेतेपद पटकावले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरजचे भरभरून कौतुक केले आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बारामती दौऱ्यावर होते. व्यापारी मेळाव्याच्या कार्यक्रमात बारामतीमधील विकासकामांची जंत्री अजित पवार यांनी मांडली. तुमच्याकडे आलेल्या ग्राहकाला मी केलेली बारामतीमधील विकासकामे सांगितली तरी माझे काम सोपे होईल, असे अजित पवार म्हणाले. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी आवर्जून बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाण याचे कौतुक केले.

अजित पवार म्हणाले, आपल्या बारामती तालुक्याचा सुपुत्र सूरज चव्हाण काल बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता झाला. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून सूरज येतो. ज्याच्यामध्ये कर्तृत्व असते, तो कधीही मागे राहत नाही. त्याच्या विनोदी व्हिडीओंनी महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले. त्याच्या कर्तृत्व गुणांनी त्याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जनतेच्या वतीने मी त्याचे अभिनंदन करतो आणि बारामतीकरांच्या वतीने त्याच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो, असे अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group