धक्कादायक ! एमबीबीएस डॉक्टरचे रुग्णालय पण तिथे एकही डॉक्टर नाही,  कामकाज कर्मचाऱ्यांवर अवलंबून
धक्कादायक ! एमबीबीएस डॉक्टरचे रुग्णालय पण तिथे एकही डॉक्टर नाही, कामकाज कर्मचाऱ्यांवर अवलंबून
img
दैनिक भ्रमर
आजकाल बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले असून स्वतःचे खिसे भरण्यासाठी असे बनावटी रुग्णाचे जीव धोक्यात घालत असतात. आता बोगस डॉक्टरांप्रमाणे बोगस रुग्णालयही चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असून काही दिवसांपूर्वी एका बोगस रुग्णालयाचा  राजस्थानमधल्या डुंगरपूर आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. 

डुंगरपूर जिल्हा रुग्णालयाजवळच्या एका इमारतीत खासगी रुग्णालय सुरू झालं होतं. या रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल होते. यात प्रामुख्याने डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन गर्भवती महिलांचा समावेश होता. जेव्हा पथक रुग्णालयात पोहोचलं आणि तपास सुरू झाला तेव्हा पथकाला अनेक गैरप्रकार झाल्याचं आढळून आलं. रुग्णालयात एकही डॉक्टर नव्हता. संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांवर अवलंबून होते. त्यानंतर पथकाने रुग्णालय सील केलं.

एसीएमएचओ डॉ. विपीन मीणा यांनी सांगितलं, की ‘आम्हाला अनेकदा या रुग्णालयाबाबत तक्रारी आल्या होत्या. जेव्हा तपास केला तेव्हा या रुग्णालयात गर्भवती महिला डिलिव्हरीसाठी अ‍ॅडमिट असल्याचं आढळलं; पण यासाठी रुग्णालयात एकही स्त्रीरोगतज्ज्ञ नव्हता. तसंच अन्य कोणतेही डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आलं.’

याविषयी अधिक  माहिती अशी की , रुग्णालयाने नेमलेले कर्मचारी रुग्णालयाचं सर्व कामकाज पाहत होते. हे कर्मचारी विनाप्रशिक्षण काम करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं.या रुग्णालयाचे रजिस्टर्ड डॉ. जिग्नेश जामोर हे एमबीबीएस असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाची नोंदणी केवळ डे केअर अर्थात ओपीडीसाठी केली होती; पण त्यांनी रुग्णालयात प्रसूती विभाग सुरू केला. त्यासाठी रुग्णालयाने स्त्रीरोग-तज्ज्ञांशी कोणताही करार केलेला नव्हता. रुग्णालयात प्रशिक्षण न घेतलेला कर्मचारी वर्ग डिलिव्हरी करत होता. त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group