मोठी बातमी ! एसटी तिकीट दरात वाढ, जाणून घ्या नवे दर एका क्लिकवर
मोठी बातमी ! एसटी तिकीट दरात वाढ, जाणून घ्या नवे दर एका क्लिकवर
img
दैनिक भ्रमर
येत्या १५ दिवसांवर दिवाळी सण  येऊन ठेपला आहे आहे. या काळात प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याच  पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने यंदा दिवाळी काळात एसटी तिकीट दरात वाढ केली आहे. ही हंगामी भाडेवाढ आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ जाहीर केलेली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात एसटी महामंडळ हंगामी भाडेवाढ करत असते.

यानुसार यंदाही दिवाळीच्या आधीच हंगामी भाडे वाढ जाहीर करण्यात आली आहे. रवर्षी महसूल वाढीच्या हेतूने एसटी महामंडळाकडून ही हंगामी भाडे वाढ केली जाते. ही हंगामी भाडे वाढ परिवर्तनशील असते. या भाडेवाढ नुसार सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीटदरात वाढ झालेली आहे.  ही भाडेवाढ 25 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. यानंतर मात्र आधीच्या तिकीट दरानुसार भाडे आकारले जाणार आहे. नक्कीच एस टी महामंडळाच्या या निर्णयामुळे दिवाळी काळात एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान , दुसरीकडे या निर्णयाचा महामंडळाला फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ सातत्याने तोट्यात आले आहे. अशा परिस्थितीत एस टी महामंडळाचा हा निर्णय महामंडळाच्या महसुलात वाढ करून आणेल, असा विश्वास महामंडळाला आहे. एसटी महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. परिवर्तन, शिवनेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली जाणार अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी समोर आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group