अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून पायावर लागली गोळी, तातडीची शस्त्रक्रिया करून काढली 9mm Bullet
अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून पायावर लागली गोळी, तातडीची शस्त्रक्रिया करून काढली 9mm Bullet
img
दैनिक भ्रमर
अभिनेता गोविंदाला स्वत:च्याच बंदुकीतून गोळी लागून पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आज १ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ही दुर्घटना घडली. रिव्हॉल्वरचे लॉक खुलं असल्याने चुकून गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातानंतर त्यांना तातडीने अंधेरीतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता तो सुखरुप आहे, काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती समोर आली आहे. सध्या तो रुग्णालयातच उपचार घेत आहे.

मॅनेजरने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा पहाटेच एका कार्यक्रमासाठी कोलकत्याला जाणार होता. तयार होत असताना त्याने त्याची लायसन्स रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवण्यासाठी हातात घेतली. मात्र ती चुकून हातातून खाली पडली. रिव्हॉल्वरचं लॉक खुलं राहिल्याने त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याचे कुटुंबीय रुग्णालयात आहेत. डॉक्टरांनी गोळी काढली असून आता तो सुखरुप आहे, काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group