विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटात मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग होत आहे. याच धरतीवर अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले म्हणाले, माझ्यासमोर काही तरुण हातात फलक घेऊन उभे आहेत. माझा फोटो त्यावर आहे आणि त्यावर लिहिलंय- 84 वर्षांचा म्हातारा… अरे मला अजून लय लांब जायचंय. 84 होवो नाहीतर 90 वर्षे होवो… हे म्हातारं काय थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. त्याची काळजी करू नका.. यासाठी तुमची मदत मला अंत:करणापासून होईल, अशी खात्री बाळगतो, असे पवार म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक जण प्रवेश करत आहेत. दरम्यान , अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला.