महाभारतात द्रौपदीच्या भूमिका करणाऱ्या रुपा गांगुली यांना कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक महिला भाजप नेत्या रुबी दास यांच्या सुटकेच्या मागणीसाठी रुपा गांगुली या पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करत होत्या. बुधवारी संध्याकाळी पोलिसांच्या त्यांच्या सह इतर भाजप कार्यकर्त्यांना देखील अटक केली आहे. शाळकरी मुलाच्या मृत्यूच्या निषेधार्थ भाजप नेते आंदोलन करत होते. मुलाला पेलोडरची धडक बसली. कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कर्मचारी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्याचा वापर करत होते.
भाजप कार्यकर्त्यांना अटक झाल्याची माहिती मिळताच रुपा गांगुली या दक्षिण कोलकाता येथील स्थानिक बांसद्रोणी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी दास यांच्या सुटकेची मागणी केली. पोलिसांच्या या कारवाई विरुद्ध त्या पोलीस स्टेशन समोरच धरणे आंदोलन करत होत्या. रुपा गांगुली यांनी दावा केला की, दास आणि इतर भाजप समर्थक शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलकांनाच अटक केली आहे. ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रुपा गांगुली त्या माजी राज्यसभा सदस्य आहेत. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.
काय आहे प्रकरण ?
शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवक अनिता कर मजुमदार या घटनेनंतर अनेक तास होऊन गेल्यानंतर ही पोहोचल्या नाही, त्यामुळे स्थानिक लोकं संतप्त झाले.यावेळी भाजप नेत्या रुबी मोंडल सह अजून ५ जणांना अटक करण्यात आली. या निषेधार्थ रूपा गांगुली सह भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी बांसद्रोणी पोलीस स्थानक गाठले. तेव्हा रुबी मोंडल सह अन्य कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी एकही आरोपीला अटक करण्यात अली नाही असा आरोप केला होता. रुपा गांगुली या रात्रभर धरणे आंदोलनाला बसल्या आणि अखेर गुरुवारी सकाळी १० वाजता कोलकाता पोलिसांनी त्यांना अटक केली.