तो गर्लफ्रेंडला लॉज वर घेऊन गेला, तिच्यावर जीवघेना हल्ला करून स्वतः जीवन संपवले, काय आहे प्रकार ?
तो गर्लफ्रेंडला लॉज वर घेऊन गेला, तिच्यावर जीवघेना हल्ला करून स्वतः जीवन संपवले, काय आहे प्रकार ?
img
दैनिक भ्रमर
दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत आहे. कुठल्याही छोट्या मोठ्या कारणांवरून जीवघेणे हल्ले यसेच हत्येचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

दरम्यान, पुणे शहरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका लॉजमध्ये एका तरूणाने त्याच्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. एवढंच नव्हे तर त्याने त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली ती तरूणी सध्या रुग्णालयात असू तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लॉजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाला असावा असा संशय पिंपरी पोलिसांना असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज लॉज मध्ये हा गुन्हा घडला. नितेश नरेश मिनेकर असे आत्महत्या केलेल्या माणसाचे नाव आहे. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा असा अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपी नितेश मिनेकर हा आपल्या प्रेयसी सोबत लॉजमध्ये गेला. ते दोघं तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद धाले.

मात्र लॉज मध्ये गेल्यानंतर काही वेळातच नितेश मिरेकर याने त्याच्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्याने त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. धारदार शस्त्राने वार केल्याने ती तरूणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे




इतर बातम्या
Join Whatsapp Group