राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यंमत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे महाविकस आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला आहे. त्यांनतर राजकीय घडामोडिंना वेग आला आहे. दरम्यान रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथ विषयी पार पडला असून सोमवार पासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा झाली. आज दिवसभर या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. एकीकडे भाजपकडून शिवसेना एकनाथ शिंदेंना दाबलं जात असल्याचा आरोप होत असताना आजच्या भेटीने चर्चांना उधाण आले. या विषयी भेटीविषयी शिवसेना एकनाथ गटाचे नेते उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत म्हणाले, कोणाच्या भेटीमुळे आम्हाला असुरक्षित ( Insecure) वाटण्याचे कारण नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कधीही खालची टीका केली नाही. ते भेटत आहे याचा अर्थ त्यांना कुठे तरी वाटत असेल की आपण चुकीचे वागलो. म्हणून ते भेट घेत आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी भेटले असावे असे मला वाटते.