मंत्रिपद नाकारल्यानंतर ,
मंत्रिपद नाकारल्यानंतर , "मी आता नवीन जबाबदारीची वाट पाहतो आहे"; नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
img
Dipali Ghadwaje
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताार रविवारी पार पडला आहे. ३९ मंत्र्यांना यात स्थान देण्यात आलं आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंत्रिमंडळात तुम्ही आहात असंच मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिला, जबाबदारी दिली त्याचं मी पालन केलं आहे. मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण अनेक प्रश्न विचारतील. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौनं, सर्वार्थ साधनं हे मी मानतो तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहतो आहे.

मी नाराज का होईन? मला मागच्या वेळी सांस्कृतिक खातं दिलं होतं. मी तिथे जीव लावून काम केलं. यापुढेही करत राहिन. मंत्री होतो तेव्हा लोकांचे प्रश्न मांडले, आता विधानसभेत आमदार म्हणून प्रश्न मांडेन. निष्ठेने काम करणं हे कर्तव्य होतं आहे आणि राहिल असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

मला मंत्रिपद देणार आहे असंच सांगितलं होतं, मंत्रिमंडळात तुम्ही नाही असं कुणीही सांगितलं नव्हतं. त्यामुळे मी आता नवीन जबाबदारीची वाट पाहतो आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group