काहीच वेळात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या विस्तारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमदारांना फोन गेले आहेत. ज्यांना फोन गेले आहे, त्यांचे मंत्रिपद निश्चित झाले आहे. दरम्यान, काही नेते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे नेते तीनदा आमदार म्हणून निवडून आलेले भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी उपनेतेपदाचा हा राजनामा दिला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यानंतरही शब्द पाळला गेला नाही, असे आठवले यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी उपनेतेपदाचा हा राजनामा दिला आहे. यामुळे भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत की काय? अशा चर्चेला आता सुरु झाल्या आहेत.