राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. भाजपकडून 19 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. भाजपकडून यावेळी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही दिग्दज लोकांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजपच्या नव्या मंत्र्यांची यादी
- गिरीश महाजन
- चंद्रकांत पाटील
- पंकजा मुंडे
- राधाकृष्ण विखे पाटील
- चंद्रशेखर बावनकुळे
- मंगलप्रभात लोढा
- आशिष शेलार
- जयकुमार रावल
- नितेश राणे
- शिवेंद्रसिंह भोसले
- पंकज भोईर
- गणेश नाईक
- मेघना बोर्डीकर
- माधुरी मिसाळ
- अतुल सावे
- संजय सावकारे
- आकाश फुंडकर
- अशोक उईके
- जयकुमार गोरे