आताची सर्वात मोठी बातमी : मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी, कुणाला लॉटरी?  वाचा सविस्तर
आताची सर्वात मोठी बातमी : मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी, कुणाला लॉटरी? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. दुपारी १२ वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 

मिळालेल्या  माहितीनुसार, उद्या १५ ते २० मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. उद्या १५ ते २० मंत्र्यांचाच शपथविधी होणार आहे. 

त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ८ ते १० मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे ५-५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाकडे कोण कोणती खाती जाणार? याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला मिळणार मंत्रि‍पदे ? 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी चार ते पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे, आदिती तटकरे, छगन भुजबळ, संजय बनसोडे, नरहळी झिरवळ यांचा समावेश असल्याची शक्यता आहे.  

शिवसेनेकडून कोणाला मिळणार मंत्रि‍पदे ? 

शिवसेनेकडून ५ ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 

भाजपकडून कोण कोणते नेते मंत्रि‍पदाची शपथ घेणार? 

भाजपकडून सर्वाधिक १० मंत्रि शनिवारी शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, शिवेंद्रराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांचा समावेश असू शकतो. त्याशिवाय मेघना बोर्डीकर, जयकुमार रावल, राणा जगजीतसिंह पाटील,राहुल ढिकले, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे आणि गणेश नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group