काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून नागपुरात भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला. बर्मन या मंत्रिमंडळात महायुतीने काही नवख्या चेहऱ्यानं संधी दिली तर काही दिग्दज नेत्यांना डावलण्यात आले. यामुळे अनेक मोठ्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजगी पाहायला मिळाली.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे आपली नाराजी जाहीर केली आहे. यानंतर आता नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. छगन भुजबळ यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
“मी उद्या येवला-लासलगाव येथे जाऊन लोकांशी बोलणार आहे. समता परिषदच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आणि मग ठरवणार. मी आता अधिवेशनाला जाणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यामुळे भुजबळ आता काय निर्णय घेतील? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भुजबळांनी नागपूर अधिवेशनाला न जाण्याचा निर्णय घेणं देखील मोठाच निर्णय आहे. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भुजबळ आता खरंच बंड पुकारणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नाराज छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये येत्या 18 डिसेंबरला बुधवारी सकाळी 11 वाजता मेळावा होणार आहे. राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मेळाव्याा उपस्थित राहणार आहेत. नाराज छगन भुजबळ मेळाव्यात काय निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, छगन भुजबळ उद्या सकाळी 11 वाजता येवला दौऱ्यावर जाणार आहेत. विधानसभा निकालानंतर प्रथमच छगन भुजबळ मतदारसंघातील येवला येथे जाणार आहेत. ते येवल्यातील संपर्क कार्यालय येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.