पुण्याचा पालकमंत्री कोण होणार ?  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं ''हे'' उत्तर
पुण्याचा पालकमंत्री कोण होणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं ''हे'' उत्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, उद्या राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून  पुण्याचा पालकमंत्री कोण होणार यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष सुरु झालाय. यावेळी भाजपला पुण्याचं पालकमंत्री मिळायलाच हवं अशी भूमिका पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाचा पुणे दौऱ्यावर होते,यावेळी त्यांना या संदर्भात विचारले असते त्यांनी सर्व माहिती लवकरच मिळेल, असे उत्तर दिले आहे.

दरम्यान , पुण्याच्या रखडलेल्या प्रोजेक्टवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याचा अजेंडा अडीच वर्षापूर्वीच सेट केला आहे. आता त्या अजेंडाला गती देणे हे महत्त्वाचे आहे ते आम्ही देऊ. अडीच वर्षापूर्वी अजित पवार ज्यावेळी महायुती सरकारमध्ये सामील होताच त्यांनी पुण्याचं पालकमंत्रिपद स्वतःकडं घेतलं. तर चंद्रकांतदादांना पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं होतं. आता यावेळी मात्र पुण्याचं पालकमंत्रिपद भाजपलाच हवं असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group