संतापजनक !  अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, भिंतीमागे नेऊन निर्वस्त्र करत अतिप्रसंग
संतापजनक ! अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, भिंतीमागे नेऊन निर्वस्त्र करत अतिप्रसंग
img
दैनिक भ्रमर
राज्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहे.    अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. 

10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले गेल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या तुर्भ्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी 30 वर्षांच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाल माती आणण्याच्या बहाण्याने आरोपी मुलाला घेऊन गेला. यानंतर त्याने 10 वर्षांच्या या मुलाला फायजर कंपनी रोडवरील एका भिंतीच्या मागे नेलं आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने त्याला निर्वस्त्र केले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत अतिप्रसंग केला आणि तिथून फरार झाला. यानंतर घाबरलेल्या मुलाने तिथून पळ काढला आणि घडलेला सगळा प्रकार घरी येऊन पालकांना सांगितला. यानंतर पालकांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.

या किळसवाण्या प्रकाराबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस परिसरातले सीसीटीव्ही तपासत आहेत. या दुष्कृत्याबाबत नागरिकांनी आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group