Nashik : अंगावर झाड पडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
Nashik : अंगावर झाड पडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
दुचाकीवरून जात असताना अचानक झाड अंगावर पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलका अनिल सोनवने (वय 55,  रा. शिवाजी नगर, सातपुर) या आज सकाळी 9  वाजेच्या सुमारास मोटरसायकल वरून गंगापुर गावाकडून शिवाजी नगर कडे येत होत्या.

सोमेश्वर बस स्टॉप जवळ त्या आल्या असता गाडीवर अचानक झाड पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. पुढील औषध उपचार करीता त्यांच्या एका परिचिताने रुग्णालयात दाखल केले.  डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group