भीषण ! भरधाव ट्रकने दोन शाळकरी मुलांना  चिरडलं ! एकाचा जागीच मृत्यू
भीषण ! भरधाव ट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडलं ! एकाचा जागीच मृत्यू
img
दैनिक भ्रमर
अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली असून पंढरपूर - सातारा मार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या सहावीतील मुलीला मिरज येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर सातारा रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ हा अपघात घडला. अपघातातील दोघेही बहीण-भाऊ होते. दोघेही सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे. राधिका धनाजी देठे आणि चैतन्य धनाजी देठे हे लहान भाऊ आणि बहीण सकाळी नेहमीप्रमाणे सायकलीवर शाळेला निघाले होते. यावेळी सिमेंट बल्करने ट्रकने मागून येऊन या बहिण भावांना चिरडलं. धडक बसल्यानंतर दोघेही चाकाखाली सापडले. पण  या अपघातात चैतन्य हा पाचवीत शिकणारा मुलगा जागीच मृत झाला आहे. तर त्याची सहावी शिकणारी मोठी बहीण राधिका ही गंभीर जखमी झाली आहे.

स्थानिकांनी धाव घेऊन तातडीने राधिकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिला उपचारासाठी मिरज इथं हलविण्यात आलं आहे. संतप्त जमावाने ट्रक अडवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेतली. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group