तनिषा भीसे यांचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सर्वांच्याच रडारवर आहेत. त्यामुळे आता या हॉस्पिटलचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भाऊसाहेब खिलारे यांनी आपली जमीन दिली होती. पण ज्या वेळी याच खिलारे यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यास नकार देणार आला होता, असा आरोप खिलारे यांचा मुलगा चित्रसेन यांनी केला आहे.
रुग्णालयाने ज्यावेळी मृतदेह ठेवणार नाही असं सांगितलं त्यावेळी आमच्या पायाखालची वाळू सरकली होती. शिवाय ही गोष्ट आम्ही कुटुंबियांनी कधी कुणाला सांगितली नव्हती. शिवाय ती आम्हाला सांगायची ही नव्हती. पण तनिषा यांच्या बरोबर जे काही झाले त्यानंतर हे बोलावं लागलं असं चित्रसेन हे म्हणाले.
भाऊसाहेब खिलारे हे पुण्याचे माजी महापौर होते. त्यांनी 1990 साली पुण्यातील त्यांची जमीन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली होती. जवळपास सहा एकर जमीन त्यांनी दिली होती.
त्यानंतर त्यावर हे धर्मादाय रुग्णालय उभे राहीले. मात्र ज्यावेळी याच भाऊसाहेब खिलारे यांची तब्बेत बिघडली त्यावेळी त्यांनी दीनानाथमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रात्री उशिरा त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.
त्यावेळी रुग्णालयात आपण हजर होतो असं चित्रसेन यांनी सांगितलं. हा कुटुंबीयांसाठी एक धक्का होता. शिवाय घरी आई होती. त्याही 75 वर्षांच्या होत्या. त्यांना हा धक्का सहन झाला नसता.
त्यामुळे खिलारे कुटुंबीयांनी भाऊसाहेबांचा मृतदेह दीनानाथ रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला. तसं त्यांनी त्यावेळी रुग्णालयाला सांगितलं. मात्र मृतदेह ठेवण्यासाठी जागा नाही असं खिलारे कुटुंबीयांना सांगण्यात आल्याचं चित्रसेन यांनी सांगितलं. ज्यावेळी असं सांगितलं गेल तो आमच्यासाठी मोठा धक्का होता. आधीच सर्वांवर दुख:चा डोंगर कोसळला होता.
त्यात दीनानाथ रुग्णालयाने मृतदेह ठेवण्यास नकार दिली होता. मात्र काही वेळात सुत्र हलली. त्यावेळी सचिन व्यवहारे यांना याबाबत माहिती देण्यात आली. ते आज या रुग्णालयात प्रमुख पदावर आहेत. त्याना हे ऐकून धक्का बसला.
त्यांनी सुत्र हलवली. दहा मिनिटातच भाऊसाहेब खिलारे यांचा मृतदेह ठेवण्यास जागा आहे असं सांगण्यात आलं. म्हणजेच रुग्णालयात जागा होती. पण ती दिली गेली नाही, असा आरोप चित्रसेन यांनी केला. आमच्या सोबत जर असं घडू शकतं तर इतर लोकांचं काय धरून बसलात असं ही ते म्हणाले.
तो आपल्यासाठी अतिशय वाईट प्रसंग होता. ज्या माणसाने आपली जागा रुग्णालयाला दिली त्याच रुग्णालया त्यांचा मृतदेह ठेवण्यासाठी जागा नव्हती या पेक्षा वाईट काय असेल असंही ते या निमित्ताने म्हणाले. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सामान्यांची रुग्णसेवा होण्या ऐवजी इथे केवळ उभारला गेला पैशाचा कारखाना असा आरोपही त्यांनी केला आहे. ज्या हेतूने जमीन घेतली त्याचा उद्देश साध्य होत नाही, असं ही ते म्हणाले.