छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या 'या' १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या 'या' १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
img
Dipali Ghadwaje
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेल्या १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून 'वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा देण्यात आलाय. या १२ किल्ल्यांची यादी युनेस्कोने जारी केली आहे.

सर्व भारतीयांना अभिमान वाटेल, असा ऐतिहासिक निर्णय युनेस्कोने घेतला आहे. 'मराठा मिलिट्री लँडस्केप' या नावाने १२ किल्ल्यांची यादी युनेस्कोने नामांकित केल्याची माहिती मिळत आहे.

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून युनेस्कोचं मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

त्यानंतर 'मराठा मिलिट्री लँडस्केप' या नावाने १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नामांकन देण्यात आलंय. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रासहित तामिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे.

सर्व १२ किल्ल्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्वाची भूमिका राहिली आहे. १२ किल्ले हे रणनीतिक गड, प्रशासनिक केंद्र आणि नौदल संरक्षण वापरले जात होते.

१२ किल्ल्यांच्या नामांकनातून मराठा साम्राज्याची लष्करी ताकद आणि १७ ते १९ व्या शतकांत विकसित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण किल्ले बांधणी आणि सैनिकी व्यवस्था अधोरेखित होते.

१२ किल्ल्यांची यादी : 

साल्हेर किल्ला , शिवनेरी किल्ला , लोहगड किल्ला ,  खांदेरी किल्ला ,  राजगड किल्ला , प्रतापगड किल्ला , सुवर्णदुर्ग किल्ला  , पन्हाळा किल्ला  ,  विजय दुर्ग  , सिंधुदुर्ग किल्ला  , जिंजीचा किल्ला

महाराष्ट्रासहित तामिळनाडूतील किल्याला  युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. यामुळे जगभरातील पर्यटक या १२ किल्ल्यांना आवर्जून भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group