राज्यावर अवकाळी पावसासह ''हे'' मोठं संकट, हवामान विभागाचा हायअलर्ट
राज्यावर अवकाळी पावसासह ''हे'' मोठं संकट, हवामान विभागाचा हायअलर्ट
img
दैनिक भ्रमर
राज्यातील वातावरणात मोठे बदल होत असून गेल्या काही दिवसांपासून  राज्यात उकाडा वाढला आहे. याचदरम्यान आता राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचदरम्यान आता अवकाळी पावसासह राज्याव मोठं संकट असल्याचा इशारा आयएमडी ने दिला आहे

राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे  वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे.   यामुळे वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

या काळात ताशी 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहून ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान या काळात राज्यात कमाल तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत, त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे विदर्भात उन्हाचा तडाखा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशावर पोहोचला.  विदर्भातील ब्रह्मपुरी व अकोल्यामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर गोंदिया, वाशिम, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ या शहरांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

नागपूर वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजनुसार विदर्भात पुढील दोन दिवस तापमान कायम राहणार असून, त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार आहे.  यादरम्यान विजांच्या कडकडाटसह वादळ वारा आणि पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी झाल्यास नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पावसामुळे हवेत गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group