दादरच्या ८० वर्षे जुन्या हनुमान मंदिरावर रेल्वेने पाडण्याची नोटीस बजावली आहे. रेल्वे प्रशासनाने दादरच्या हनुमान मंदिराच्या विश्वस्थांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटलंय की, दादर पूर्वेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या बाहेर अनधिकृत मंदिर आहे. यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून नोटीस मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच , उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. मंदिराची १९६९ मध्ये धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झाली असताना रेल्वेचा हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे. भाजप नेत्यांनी मंदिर पाडू देणार नाही, असे म्हटले आहे. “एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
रेल्वे प्रशासनाने पाठवलेल्या नोटीस मध्ये 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वत: पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल, असं नोटीसमध्ये म्हटल्याची माहिती आहे. खरंतर दादरमधलं हे मंदिर तब्बल 80 वर्षे जुनं असून स्टेशनवर काम करणाऱ्या हमालांनी बांधलंय. विशेष म्हणजे या मंदिराची सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून 1969मध्ये धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीही झालीय. तरीही रेल्वेने 7 दिवसांचा अल्टिमेटम मंदिराच्या विश्वस्थांना दिलाय. अर्थात मंदिर तुटू देणार नाही, असं भाजपनं म्हटलंय. यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दरम्यान, हनुमान मंदिर आणि बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला आहे. एका फोनमध्ये मोदींनी युक्रेनचं युद्ध थांबवलं. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर पावलं उचलावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे सोमय्या यांनी रेल्वे विभागाला तसं पत्र देखील पाठवलं आहे. तसेच “दादरला हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटीसीचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी मला दिले आहे. आम्ही ते मागे घेतील असे पाहू. अनेक दशके जुने हनुमान मंदिर पाडता येणार नाही”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.