राज्यात महायुतीचे सरकार आले असून रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविशी सोहळा पार पडला. परंतु अद्यापही खातेवाटप झालेले नाही .याचदरम्यान आत राजकीय वर्तुळात घडामोडींचा वेग आला असून भाजप शिवसेनेला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपमधून राम शिंदे यांचं नाव चर्चेत आलं आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहे.त्यामुळे भापज कडून एकनाथ शिंदे याना धक्का बसण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. याच अधिवेशनामध्ये विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मागील दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे सभापती कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे आता सभापतीपदासाठी राम शिंदे यांचं नाव समोर आलं आहे. राम शिंदे यांचा अगदी कमी मतांनी पराभव झाला. त्यामुळे राम शिंदे हे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळेच भाजपकडून त्यांना सभापतीपदासाठी नाव समोर आलं आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापतीपदावर आहे. शिवसेनेकडून सभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे यांनाच संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खातेवाटपातील महत्त्वाची खात्यांसह विधानपरिषदेच्या सभापतीपदाबाबत आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, सभापतीसाठी भाजप आग्रही आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये आपलाच सभापती असावा असा भाजपमधून दावा करणार आहे. राम शिंदे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपकडून राम शिंदे बुधवारी सकाळी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.