मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची बदली झाली आहे. भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचे पत्रही समोर आले आहे. या पत्रात शासनाने आपली बदली केल्याची माहिती अश्विनी भिडे यांना देण्यात आली आहे. यासोबत मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुंबई ब्रिजेश सिंह यांच्या जागी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आपण ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरित पदभार स्विकारावा असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुढील आदेश येईपर्यंत मेट्रोच्या पदाचा कार्यभारही सांभाळावा, असे आदेश भिडे यांना देण्यात आले आहेत.
अश्विनी भिडे या एक आयएएस अधिकारी आहेत. छोट्याश्या गावातून येऊन या पदापर्यंत पोहोचल्याने त्या लाखो तरुणांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. त्या मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जातात. मुंबईभर मेट्रोचं जाळ विणण्यात, राज्याला औद्योगिकरणाच्या बाबतीत प्रगतीपथावर नेण्यात अश्विनी भिडे यांचा महत्वाचा वाटा आहे.