महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर आता राज्याचा शपथविधीदेखील पार पडला असून यात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपचे नेते नितेश राणे यांनी शपथ घेतली. यानंतर त्यांचे बंधू निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
3 राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार आहे. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की, देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो, असे निलेश राणे म्हणाले.
तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आल्याचे ते उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा.आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, असे आवाहन त्यांनी केले.
तुम्हालाही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठीण होईल, असे निलेश राणे ठाकरेंना उद्देशून म्हणाले.