मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र? नक्की काय घडतंय ?
मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र? नक्की काय घडतंय ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून एकनाथ शिंदे आणि  अजित पवार यांनी उपमुख्यंमत्रीपदाची शपथ घेतली . दरम्यान आज महायुतीच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात आज विस्तार होत आहे. तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत म्हणजे नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी पार पडत आहे. एकीकडे हा शपथविधी पार पडत आहे तर दुसरीकडे मुंबईत मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ मुंबईत एका हॉटेलमध्ये एकत्र आल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र नसले तरी आज एका कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधू एकत्र आले होते. एका खासगी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसले. आज रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा विवाह सोहळा मुंबईत एका हॉटेल मध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांनी यावेळी राज ठाकरेंचं स्वागत केले आहे.

दरम्यान, रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र एका कार्यक्रमात राज आणि उद्धव एकत्र आले तरी दोन्ही भावांची थेट भेट झाली नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group